Western Railway Recruitment 2023 | मुंबईमध्ये रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, आजच करा ऑनलाईन अर्ज

Western Railway Recruitment 2023 | मित्रांनो पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरू आहे.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्हाला जर रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही या पदासाठी नक्की अर्ज करू शकता. ही भरती मुंबई येथे होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. हे सगळे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

पश्चिम रेल्वे अंतर्गत गट’क’ आणि गट ‘ड’ या पदांच्या एकूण 64 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून आता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. दहा नोव्हेंबर 2023 पासून हे अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तर नऊ डिसेंबर 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

हेही वाचा –Bank Jobs Recruitment | पुण्याच्या रहिवाश्यांसाठी मोठी संधी, ‘या’ बँकेत मोठी भरती सुरु

महत्वाची माहिती | Western Railway Recruitment 2023

  • पदाचे नाव – गट क आणि गट ड पदांच्या जागा भरल्या जाणार आहे
  • पदसंख्या – एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा- 18 वर्षे ते 25 वर्षे इतकी आहे
  • अर्ज शुल्क – सर्व उमेदवारांसाठी रुपये 500/- असेल, तर SC/ST/Ex-servicemen/ उमेदवारांसाठी 250/- रुपये इतके अर्ज शुल्क आकारले जाईल
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख
  • अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 असेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा