SPPU Recruitment 2024 | सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अटी आणि अर्ज प्रक्रिया

SPPU Recruitment 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ने प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार SPPU unipune.ac.inच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 01 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे

रिक्त जागा तपशील

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या 111 जागा भरायच्या आहेत.
  • प्राध्यापक: 32 पदे
  • सहयोगी प्राध्यापक: 32 पदे
  • सहाय्यक प्राध्यापक: 47 पदे

हेही वाचा – BEL Recruitment 2024 |’भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती सुरु, या प्रकारे करा अर्ज

अर्ज फी | SPPU Recruitment 2024

SPPU फॅकल्टी पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी उत्तीर्ण केलेली असावी. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.

पगार

  • प्राध्यापक: स्तर 14, सुरुवातीचा पगार रु 1,44,200
  • सहयोगी प्राध्यापक: स्तर 13A, सुरुवातीचा पगार रु 1,31,400
  • असिस्टंट प्रोफेसर: लेव्हल 10, सुरुवातीचा पगार रु 57,700