SAIL Jobs 2023 | SAIL मध्ये नोकरीची भन्नाट संधी, महिन्याला मिळेल इतका पगार

SAIL Jobs 2023 |मित्रांनो तुमच्यासाठी नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. नुकतेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने त्यांच्या अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहे. हे अर्ज भरण्याची तारीख 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये त्यांनी 110 पदांसाठी भरती चालू केली आहे. ही पदे ऑपरेटर सह तंत्रज्ञ, ऑपरेटर कम तंत्रज्ञ आणि परिचर सह तंत्रज्ञ ही आहेत. तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

हेही वाचा – Cochin Shipyard Limited | उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार लाखो रुपये मासिक पगार

निवडीसाठी प्रथम CBT चाचणी होईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल. सीबीटी हा वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल. अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWBD, ESM, विभागीय उमेदवारांना 300 रुपये भरावे लागतील.

निवड झाल्यावर, S-3 पदाचा पगार वर्षाला सुमारे 10 लाख रुपये आहे. तर S-3 ग्रेडचा पगार जवळपास 9.9 लाख रुपये आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा