Railway Recruitment 2023 | दहावी पास असलेल्यांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी,374 जागांसाठी मेगाभरती सुरु

Railway Recruitment 2023 | मित्रांनो आता तुम्ही केवळ दहावी पास असाल किंवा तुमची आयटीआय झाले असेल, तरी तुम्हाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. आता ती कशी हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स यांनी अप्रेंटिसच्या पदासाठी बंपर भरती काढली आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यातील खास गोष्ट म्हणजे या तब्बल 374 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची खूप जास्त संधी आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून ही नोकरी प्राप्त करू शकता.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 25 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. तसेच, कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर आधी खाली दिलेल्या गोष्टी वाचा.

पदांची संख्या | Railway Recruitment 2023

  • IIT जागा: 300 जागा
  • ITI नसलेल्या जागा: 74 पदे

योग्यता

  • ITI नसलेले: उमेदवारांनी इयत्ता 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराने अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपूर्वी विहित पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.
  • ITI: उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10वी वर्ग परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हेही वाचा –WRD Maharashtra Recruitment 2023 | जलसंपदा विभागात 4497 पदांची नवीन भरती, पाहा नोकरीचे स्थळ आणि पगार

या वयोमर्यादेतील लोक अर्ज करू शकतात

ITI उत्तीर्ण नसलेल्यांसाठी वयोमर्यादा 15 ते 22 वर्षे आणि ITI उत्तीर्णांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

फॉर्म भरण्यासाठी अर्जाची फी भरावी लागेल

उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. पेमेंट डेबिट/क्रेडिट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे केले जावे. याशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार BLW च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यसाठी येथे क्लिक करा