Pune Jobs : पुण्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कुठे भरती सुरु ते चेक करा

JOB 18 टीम । तुम्ही जर पुण्यात नोकरीची संधी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास नोकरीबाबत माहिती देणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे शहरात विविध १७१ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरता आवाहन करण्यात आले असून त्यांनतर निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. खाली आम्ही सविस्तर माहिती दिली आहे.

अर्ज करण्याची मुदत

सदर भरती प्रक्रिये करीता अर्ज दि. 06 जुन 2023 पर्यंत ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे येथे कार्यालयीन वेळेत (शासकिय सुट्टी वगळता) प्रत्यक्ष स्वीकारले जातील.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

दंत चिकित्सक – MDS/ BDS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – M.Sc Statistics
वित्त व लेखाधिकारी – B.Com/ M.Com.
कार्यक्रम समन्वयक – MSW or MA in social sciences
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Graduate in any Discipline
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – GNM./ B.Sc. Nursing
सांख्यिकी अन्वेषक – Graduation in Statistics or Mathmatics, MSCIT
एएनएम – ANM
सुविधा व्यवस्थापक – BE Electronics & Telecommunication/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma Electronics & Tele Communication/ IT/ Computer Science
डायलिसिस टेक्निशियन – 10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

नोकरी ठिकाण

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

वयोमर्यादा

खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग -43 वर्ष

अर्ज शुल्क

अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु १५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु १००/-

अर्ज पद्धत्ती

या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीने भरला जाणार असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे हा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुन 2023

अधिकृत वेबसाईटhttp://www.zppune.org