MPSC Recruitment 2023 |मित्रांनो तुम्ही देखील मागील अनेक दिवसापासून सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता तुमचा हा शोध संपणार आहेm कारण नुकतेच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती काढण्यात आलेली आहे. आणि त्याचे नोटिफिकेशन देखील त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहेत. त्यामुळे आता आपण या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्जाची शेवटची तारीख याची सविस्तर माहिती घेऊयात.
या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक या पदाच्या 32 जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेतून पीएचडी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच जर्नल या पदासाठी लिखित जागा आहे. प्राध्यापक पदाचा दहा वर्षाचा अनुभव असतो निवड झालेल्या प्राध्यापकाला दर महिन्याला एक लाख 1,44 हजार 200 ते दोन लाख एवढा पगार दिला जाईल.
तसेच असोसिएट प्रोफेसरच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याला अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देखील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे 55% गुणांसह इतर पदवी असावी उमेदवाराकडे किमान सात संशोधने प्रकाशित असावी. त्या व्यक्तीला प्राध्यापक पदाचा एकूण आठ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक लाख एकतीस हजार चारशे रुपये ते दोन लाख 17 हजार 100 रुपये एवढा पगार दिला जाईल.
हेही वाचा- Western Railway Recruitment 2023 | मुंबईमध्ये रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, आजच करा ऑनलाईन अर्ज
सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. याला अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून विद्यापीठातून 55% गुणांसह पदवी उत्तर पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन सायन्स अँड डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी असणे देखील गरजेचे आहे. नेट आणि सेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 57 हजार 700 ते 1 लाख 824 एवढा पगार दिला जाईल.
लेक्चरर या पदासाठी एकूण 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराचे बीएड पूर्ण असावे. तसेच त्याच्याकडे किमान दोन विषयात पदवी असावी. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये एवढा पगार दिला जाईल.
या अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 19 ते 45 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षाची सवलत दिली जाईल. तसेच 9 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा