MPSC Recruitment 2023 | मित्रांनो सरकारी नोकरी करावी अशी अनेकांची इच्छा असते.परंतु त्यांना संधी मिळत नाही. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आताMPSC मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत एक मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. सरकारच्या या भरतीद्वारे विविध विभागातील 32 पदे भरली जाणार आहे. त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर पर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे. तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणती पदे असणार आहेत? पात्रता काय असणार आहे? अर्ज कसा करावा? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोगाकडून नव्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग महसुल वनविभाग यांसारख्या विभागांमध्ये विविध संवर्गातील 32 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राचार्य संचालक अनुवादक मराठी आणि अनुवादक हिंदी सहाय्यक वन सांख्यिकी या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदासाठी इच्छुक असणाऱ्याकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकता.
हेही वाचा- IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; पहा काय आहे पात्रता?
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
- प्राचार्य/संचालक – १८ जागा
- अनुवादक मराठी (गट-क) – ०४ जागा
- अनुवादक हिंदी (गट-क) – ०३ जागा
- सहाय्यक वन सांख्यिकी (गट-ब) – ०७ जागा
- एकूण रिक्त पदसंख्या – ३२ जागा
पात्रता
- प्राचार्य किंवा संचालक – संबंधित विषयात पीएचडी आणि अध्यापन तसेच संशोधनाचा एकूण पंधरा वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
- अनुवादक मराठी गट क – मराठी भाषेतील पदवी
- अनुवादक मराठी गट क – हिंदी भाषेतील पदवी
- सहाय्यक वन संखिकी गट ब – स्टॅटिस्टिक मॅथेमॅटिक्स इकॉनॉमिक्स कॉमर्स या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
हेही वाचा – Job Alert : महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत नोकरीची संधी; इथे करा अर्ज
वेतन:
- प्राचार्य/संचालक – १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २००
- अनुवादक मराठी (गट-क) – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
- अनुवादक हिंदी (गट-क) – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
- सहाय्यक वन सांख्यिकी (गट-ब) – ४१ हजार ८०० ते १ लाख ३२ हजार ३००
- नोकरीचे ठिकाण– महाराष्ट्र
- अर्ज पद्धती- ऑनलाईन
- अर्ज करण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नंबर 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा