MPHC Civil Judge Recruitment 2023 | दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर माहिती

MPHC Civil Judge Recruitment 2023  | मध्य प्रदेश उच्च न्यायालय, जबलपूर येथे दिवाणी न्यायाधीश पदांसाठी भरती सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट mphc.gov.in ला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

परीक्षेच्या तारखा | MPHC Civil Judge Recruitment 2023 

एमपी हायकोर्ट जबलपूर येथे दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना 22 ते 24 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ असेल. यानंतर 14 जानेवारी 2024 रोजी प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. तर पूर्व परीक्षेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होईल. दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा 30 आणि 31 मार्च 2024 रोजी घेतली जाईल. तर मुख्य परीक्षेचा निकाल 10 मे 2024 रोजी प्रसिद्ध होईल.

हेही वाचा – BMC Lokmanya Tilak Bharti 2023 | मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, महिना मिळणार एक लाख रुपये पगार

रिक्त जागा तपशील

  • मध्यप्रदेशात दिवाणी न्यायाधीशांच्या १९९ जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही खाली रिक्त पदांचा तपशील पाहू शकता-
  • दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) नियमित ६१ पदे
  • दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) अनुशेष 138 पदे

अर्ज फी

एमपी हायकोर्ट जबलपूर येथे दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/अन्य राज्यातील उमेदवारांना रु. 977.02 ची अर्ज फी जमा करावी लागेल, तर OBC/SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना रु. 577.02 ची अर्ज फी जमा करावी लागेल. परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन फी मोड डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मोडद्वारे भरावे लागेल.