कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकरीची संधी; पात्रता फक्त 4 थी पास

जर तुम्ही चौथी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला विद्यापीठांमध्ये नोकरी करायची असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या द्वारे एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार, अन्नसुरक्षा दल सदस्य या पदाकरिता विद्यापीठाने भरती (Konkan Agricultural University Recruitment) जाहीर केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने परिश्रम एक मानधन या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे तसेच फक्त 11 महिन्याच्या कालावधी साठी उमेदवाराला अन्नसुरक्षा दल सदस्य म्हणून कामावर रुजू केले जाईल.अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची देखील नोंद उमेदवारांनी घ्यावी.

पदाचे नाव – अन्नसुरक्षा दल सदस्य
एकूण जागा – 10
पात्रता – ४ थी पास
वय – 38 ते 43 वर्ष
अर्ज कसा भरावा – ऑफलाईन (खाली पत्ता दिला आहे)

अर्ज पाठवण्यासाठी खालील पता पहा-

पत्ता मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शेती संदर्भातील ज्ञान असणे आवश्यक आहेत तसेच वरील दिलेल्या पत्त्यावर लिखित दिनांक तारखे अंतर्गत उमेदवाराला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज करत असताना इनवलप वर कोणत्या पदावर अर्ज करत आहे याबद्दल माहिती देखील लिहिणे आवश्यक आहे.या पदाची जाहिरात विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाईट अवश्य पाहू शकता.