Job Alert : महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत नोकरीची संधी; इथे करा अर्ज

जॉब १८ न्यूज ऑनलाईन । पालिकेमध्ये नोकरी मिळावी (Job Alert) यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. या ना त्या मार्गाने आपल्याला नोकरी मिळून आपले पुढील आयुष्य सुकर व्हावे यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असतो. अनेक जण आपल्या आजूबाजूला असे देखील आहेत जे शैक्षणिक रित्या पात्र असले तरी प्रचंड प्रमाणात असलेल्या स्पर्धेमुळे पालिकेमध्ये नोकरी मिळत नाही परंतु जर तुमची देखील इच्छा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव महानगरपालिकेने (Jalgaon Municipal Corporation) तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर बंपर भरती काढलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वप्न हमखास पूर्ण करू शकता.

जळगाव महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता, वायरमन, आरोग्य निरीक्षक आणि टायपिस्ट या महत्त्वाच्या पदांसाठी भरती काढलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून अनेक तरुण आपले स्वप्न हमखास पूर्ण करू शकतात चला तर मग जाणून घेऊया पुढील पदांसाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याबद्दल..

1) कनिष्ठ अभियंता (बांधकाम क्षेत्र)

ज्या उमेदवारांना उपरोक्त पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे स्थापत्यशास्त्रातील अभियांत्रिकी पदवी असणं गरजेचं आहे तसेच महानगरपालिकेने वरील पदासाठी 10 जागा शिल्लक ठेवलेल्या आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्ष असणं गरजेचं आहे. पदाकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीचा वापर करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे, त्यानंतरचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यावी.

2) वायरमन– Job Alert

वायरमन पदासाठी जर तरुणांना अर्ज करायचा असेल तर त्यांची शिक्षण शैक्षणिक पात्रता ही तारतंत्री कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने वरील पदासाठी 12 जागा शिल्लक ठेवलेल्या आहेत. उमेदवाराचे वय 43 वर्ष असणे गरजेचे आहे तसेच या पदाकरिता देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

३) आरोग्य निरीक्षक

आरोग्य निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदाकरिता महानगरपालिकेने 10 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साधारणपणे 43 वर्ष असणं गरजेचं आहे.

४) टायपिस्ट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर

वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी टायपिंग किंवा आणि MSCIT ची परीक्षा पास असणं गरजेचं आहे तसेच प्रमाणपत्र देखील बाळगणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने टायपिस्ट व कम्प्युटर ऑपरेटर या पदाकरिता 20 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. वरील सर्व पदांकरिता (Job Alert) अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जळगाव महानगरपालिकेच्या jcmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता

खालील पत्त्यावर पाठवा अर्ज-

आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत, दहावा मजला, सरदार वल्लभभाई पटेल टावर महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव 425001