IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; पहा काय आहे पात्रता?

जॉब 18 न्यूज । जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीसाठी वणवण फिरत असाल तर आता चिंता करू नका. तुम्हाला घरबसल्या सरकारी नोकरी मिळवता येणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRCTC मध्ये विविध पदांची बंपर भरती (IRCTC Recruitment 2023) काढण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे . त्यामुळे तुम्ही जर पदवीधर असाल तर नोकरीची हा सुवर्णसंधी सोडू नका.

IRCTC कडून या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी IT पदांच्या विविध जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर तरुणांना वरील पदासाठी अर्ज देखील करण्यात सांगण्यात आलेले आहेत. उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने (IRCTC Recruitment 2023) करायचा आहे. अर्ज करत असताना उमेदवाराला कार्यकारी आयटी असे पद अर्जामध्ये नमूद करायचे आहे. एकूण दोन (2) पदासाठी ही भरती करण्यात आलेली आहे. उमेदवार अर्ज करत असताना त्याची शैक्षणिक पात्रता देखील तपासली जाणार आहे. उमेदवारांनी कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षापेक्षा कमी असायला हवे. उमेदवाराला अर्ज पुढील ईमेल आयडीवर करायचा आहे. [email protected]

कधीपर्यंत कराल अर्ज – IRCTC Recruitment 2023

उमेदवारांना 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत वरील पदाकरिता अर्ज करता येणार आहेत, त्यानंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी उमेदवार IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला http://www.irctc.com भेट देऊ शकता.