Indian Railway Recruitment 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी, 3 हजारांहून अधिक पदांची होणार भरती

भारतीय रेल्वेमध्ये काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता रेल्वेत जागा निघालेल्या आहेत. आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.या भरतीची नोटीस काही काळापूर्वी प्रसिद्ध झाली होती आणि आता त्यांच्या अर्जाची लिंकही उघडली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख | Indian Railway Recruitment 2023

RRC NR शिकाऊ पदांसाठी नोंदणी लिंक 11 डिसेंबर रोजी खुली आहे आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2024 आहे.

हेही वाचा- MPHC Civil Judge Recruitment 2023 | दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर माहिती

पदसंख्या

या भरती मोहिमेद्वारे एकूण ३०९३ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 पूर्वी अर्ज करा.

अर्ज पद्धत

तुम्ही या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला RRC NR च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे – rrcnr.org.

पात्रता निकष

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवाराने संबंधित विषयातील आयटीआय डिप्लोमा देखील केलेला असावा.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षे आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गाला फी भरावी लागत नाही. निवडीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. निवड केवळ गुणवत्तेवर आधारित असेल.