Income Tax Department Bharti 2023 |मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर कदाचित आज नंतर तुमचा हा शोध संपेल. कारण की आता आयकर विभागात नोकरीची एक खूप चांगली संधी उपलब्ध आहे. आयकर विभागामार्फत एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या आयकर विभागातर्फे कर सहाय्यक हवालदार पदांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून आता अर्ज मागविण्यात आलेले आहे.
तुम्हाला जर या भरतीचे अर्ज करायचे असेल, तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. आता यासाठी पात्रता काय असेल? शेवटची तारीख काय असेल? तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रता या सगळ्याची माहिती आपण जाणून घेऊया.
हेही वाचा- Bank Jobs Recruitment | पुण्याच्या रहिवाश्यांसाठी मोठी संधी, ‘या’ बँकेत मोठी भरती सुरु
महत्वाची माहिती | Income Tax Department Bharti 2023
पदाचे नाव – कर सहाय्यक, हवालदार
- एकूण पदसंख्या – २९
- कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
- हवालदार – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास किंवा समकक्ष.
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
- अर्जाची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
पगार
- कर सहाय्यक – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये महिना.
- हवालदार – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये महिना.
असा करा अर्ज
- भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३०३ नोव्हेंबर २०२३ आहे.