Cochin Shipyard Limited | उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार लाखो रुपये मासिक पगार

Cochin Shipyard Limited |मित्रांनो तुमच्यासाठी एक नोकरीची अतिशय भन्नाट संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. नुकतेच कोचिंग शिपायार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांची भरती होणार आहे. या भरतीतून डेप्युटी मॅनेजर पदांच्या एकूण पाच जागा रिक्त आहेत आणि त्या जागा भरल्या जाणार आहेत.

कोचीन शिपया लिमिटेड म्हणजे सीएसएलने विविध उपव्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटल इलेक्ट्रिकल आणि आयटी पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 15 नोव्हेंबर 2023 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर 11 डिसेंबर २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हेही वाचा – BCAS Recruitment 2023 | गट A, B, C पदांसाठी आजचं करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि पदे

पदसंख्या

  • डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल -02
  • डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल – 01
  • डेप्युटी मॅनेजर इन्स्ट्रुमेंटेशन – 01
  • डेप्युटी मॅनेजर आयटी – 01

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराच्या किमान 60 टक्के गुणांसह ट्रेडमध्ये पदवीधर असावा तसेच त्याला सात वर्षाचा कामाचा अनुभव देखील असावा.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष गरजेचे आहे त्यामध्ये ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट दिली जाईल तर दिव्यांग उमेदवारांना पाच वर्षाची सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क

कोचीन शिप्यार्ड लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शंभर रुपये भरावे लागतील तसेच एसी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना विनामूल्य आहे अर्ज भरता येईल

पगार

या प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पन्नास हजार ते एक लाख साठ हजार एवढे मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया

उमेदवारांना गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यातून निवड केली जाईल शॉर्टलिस्ट केलेले उमेदवारांना त्यांच्या कामाचे अनुभवाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन देखील द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.