CIDCO Bharti 2023 : सिडको मध्ये नोकरी करायचीय? महिना 2 लाख रुपये पगार, जाणून घ्या सविस्तर माहिती

JOB 18 टीम । तुम्हाला जर शहरात राहून सरकारी नोकरी करायची असेल तर सिडको हा एक उत्तम पर्याय आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) येथे कंपनी सचिव पदासाठी भरती जाहीर झाली आहे. सिडको मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्जाप्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या पदासाठी तब्बल २ लाख १४ हजार रुपये इतका प्रतिमाह पगार आहे. त्यामुळे अनेकजण या पदासाठी आपली ताकद लावत आहेत. आम्ही खाली सविस्तर अर्जप्रक्रिया आणि ऑनलाईन लिंक दिलेली आहे.

CIDCO Bharti 2023

पदाचे नाव – कंपनी सचिव

पद संख्या – १

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कंपनी सचिव कायदा १९५६ अंतर्गत स्थापित आणि समाविष्ट केलेल्या कंपनी सचिवांच्या संस्थेचा सहयोगी किंवा सहकारी सदस्य असावा. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात अवश्य पाहावी.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – ४७ वर्ष.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (कार्मिक), सिडको लि., सिडको भवन, दुसरा मजला, CBD बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जुन २०२३.

अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in

पगार – पे मॅट्रिक्सचे लेव्हल s- २७ नुसार भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला १ लाख १८ हजार ५०० रुपये ते २ लाख १४ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

अर्ज भरण्यासाच्या आणि पाठविण्याच्या अधिकच्या माहितीसाठी खालील PDF जाहिरात अवश्य पाहा-

https://drive.google.com/file/d/1JVcYyTFbx-Ine80rRM2xPod04K4Hsaaf/view?usp=sharing

Comments are closed.