Air India Recruitment : 10 वी पास उमेदवारांना Air India मध्ये नोकरीची संधी; इथे करा अर्ज

Air India Recruitment । जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते आणि यासाठी प्रत्येक क्षण प्रामाणिकपणे प्रयत्न देखील करत असतो. अनेकजण मुलाखती देतात परंतु त्यांना फारसे काही कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आता चिंता करू नका. तुम्हाला Air India मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. एअर इंडिया मध्ये थेट मुलाखती द्वारे दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरिता मोठी भरती (Air India Recruitment) काढण्यात आलेली आहे, यामुळे तुमचे भवितव्य आता उज्वल होऊ शकते, चला तर मग जाणून घेऊया एअर इंडियाने कोणकोणत्या पदांची भरती काढलेली आहे त्याबद्दल…

Air India मध्ये इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड द्वारे काही महत्त्वाच्या पदांची भरती करण्यात आलेली आहे. या पदाच्या माध्यमातून उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी देखील बोलावले जाणार आहेत. यामध्ये हँडीमेन, ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल आणि रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदांचा (Air India Recruitment) समावेश आहे.

हँडीमेन- Air India Recruitment

हँडीमेन या पदासाठी एअर इंडियाने 323 तसेच अनेक पदांकरिता भरतीसाठी आवश्यक असणारी अधिसूचना जाहीर केलेली आहे. उपलब्ध पदासाठी उमेदवार 3 ऑक्टोबर पासून रजिस्ट्रेशन करू शकतात. अर्ज पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि याकरिता तुम्हाला एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आलेली आहे, त्यानंतर तुमचे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत तसेच फॉर्म शुल्क बद्दल सांगायचे झाल्यास OBC श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील व SC प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल-

वरील पदासाठी एअर इंडियाने 5 पदे रिक्त ठेवलेले आहे. या पदासाठी थेट मुलाखती घेणार येणार आहे. उमेदवारांना 17 ऑक्टोबर पासून मुलाखतीला यायचे आहे. मुलाखतीची वेळ 9 ते 12 वाजेपर्यंत देणार आहेत. इंटरव्यू सेंटर म्हणूनच वरील पदासाठी मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.

रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह-

वरील पदासाठी एअर इंडियाने 23 पदे रिक्त ठेवलेली आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 17 ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी जायचे आहे. ही मुलाखत 9 ते 12 या दरम्यान होईल या मुलाखतीसाठी उमेदवारांना कोचीन सेंटर येथे जायचे आहे . वरील सर्व पदांसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची माहिती एअर इंडियाच्या aiasl.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.