जॉब १८ न्यूज ऑनलाईन । अनेक जण देशसेवा करण्यासाठी लष्कर सेवेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात. काहीजण वयाच्या सोळाव्या वर्षी पासूनच आपल्याला लष्करात रुजू व्हायचे आहे, असे स्वप्न देखील पाहतात. त्यानुसार वेगवेगळ्या परीक्षा, शारीरिक मेहनत यावर लक्ष केंद्रित करत असतात परंतु जर आता तुम्हाला खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल तर चिंता करू नका. फक्त जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला भारतीय लष्करामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. भारतीय लष्कराच्या हेडकॉटर मधील साऊंड कमांड ग्रुप करिता सी पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया )Indian Army Recruitment 2023) सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जे उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेले आहे अशा सर्वांसाठी देशसेवा करण्याची एक नवीन संधीच चालून आलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.
कशी आहे भरती- Indian Army Recruitment 2023
भारतीय लष्करच्या हेडकॉटर साऊथ कमांड यांनी वर्ष 2023 साठी ग्रुप सी या पदाकरिता भरती सुरू करण्याचा विचार केलेला आहे. या भरती अंतर्गत एकंदरीत 24 पदांची जागा भरली जाणार आहे त्यासाठी दिनांक 18 सप्टेंबर पासून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे. जे तरुण या पदासाठी इच्छुक आहेत त्यांना 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. इंडियन आर्मी साउथ कमांड ग्रुप सी या पदाकरिता (Indian Army Recruitment 2023) निवड झालेल्या उमेदवारांना 18000 ते 63,200 रुपया दर महिना पगार दिला जाईल.
एकूण पदे – 24
पात्रता – १० वी पास
अर्ज फी– नाही
आवश्यक वय -18 ते 25 वर्ष
मिळणारे वेतन – 18000 ते 63,200 महिना
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 8 ऑक्टोबर 2023
ग्रुप सी या पदाकरिता अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे आहे.
https://www.hqscrecruitment.in/
या वेबसाईटवर गेल्यानंतर या पदासंदर्भातील आवश्यक माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे.
सर्व माहिती उमेदवारांनी पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे.
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष यादरम्यान असायला हवे तसेच उमेदवाराची वय मोजणी 8 ऑक्टोबर या तारखेनुसारच मोजावी. जर निश्चित केलेल्या वयापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
अर्ज भरल्यानंतर वरील ग्रुप सी या पदासाठी परीक्षा देखील आयोजित केली जातील.
या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक वेबसाईटवर दिले जाईल.