EdCIL Recruitment 2023 | मंत्रालयात विविध पदाबासाठी नोकरीची भरती सुरु, मिळणार 2 लाखांपर्यंत पगार

EdCIL Recruitment 2023 | नोकरीच्या शोधात जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही नोकरीची एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. आता भारतीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत एडशील मधील विविध पदांसाठी आधी सूचना जारी केली आहे. शिक्षण मंत्रालयात एकूण 39 रिक्त पद आहेत. आणि ते 39 रिक्त पदांवर भरती चालू आहे त्यांना मंत्रालयात नोकरी करायची आहे. त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. खास गोष्ट म्हणजे ही भरती कंत्राट पद्धतीने केली जाणार आहे. या कार्याचा कालावधी सुरुवातीला दोन वर्ष असेल तो गरजेनुसार आणि उमेदवाराच्या कामानुसार पाच वर्षे केला जाईल. त्यामुळे आता आपण या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात

एकूण रिक्त जागा – 39

  • सल्लागार – 26
  • वरिष्ठ सल्लागार- 7
  • मुख्य सल्लागार – 4
  • प्रधान मुख्य सल्लागार -2

शैक्षणिक पात्रता | EdCIL Recruitment 2023

  • सल्ला घराच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयात पदवीत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • कामाचा तीन वर्षे अनुभव गरजेचा आहे
  • वरिष्ठ सल्लागारासाठी उमेदवाराचा पाच वर्षाचा अनुभव गरजेचा आहे
  • तसेच मुख्य सल्लागारासाठी आठ वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि प्रिन्सिपल चीफ कन्सल्टंट साठी दहा वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.

हेही वाचा – AAICLAS Security Screener Recruitment 2023 | सिक्युरिटी स्क्रीनरच्या 900 हून अधिक पदांसाठी भरती, अशी होणार निवड

पगार

या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला 80 हजार ते तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.

अर्ज कसा करायचा

  • सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला करिअर ऑप्शन मध्ये एप्लीकेशन पेज ही लिंक दिसेल.
  • ही लिंक ओपन केल्यावर एक फॉर्म उघडेल.
  • त्यानंतर सर्व माहिती तिथे भरा आणि कागदपत्र अपलोड करा
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा