SBI Clerk Recruitment 2023 | SBI मध्ये लिपिक पदासाठी भरती सुरु, 8283 पदांसाठी अधिसूचना जारी

SBI Clerk Recruitment 2023 |बँकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील त्यांनी जाहीर केली आहे. बँकेने कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

या भरतीद्वारे लिपिक संवर्गातील कनिष्ठ संयोगी या पदाच्या 8283 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. 17 नोव्हेंबर 2023 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. आणि सात सप्टेंबर 2023 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया संपणार आहे.

हेही वाचा –Indian Railway Recruitment 2023 | रेल्वे क्रीडा कोट्यासाठी 64 रिक्त पदांसाठी भरती सुरु, गट C आणि D पदांसाठी अधिसूचना जार

महत्वाच्या तारखा

अर्ज उघडण्याची तारीख: नोव्हेंबर 17, 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 7, 2023
प्राथमिक परीक्षा: जानेवारी 2024
मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर 2023 किंवा त्यापूर्वीची आहे याची खात्री करावी. वयोमर्यादा 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया | SBI Clerk Recruitment 2023

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी समाविष्ट असते. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असलेली ऑनलाइन प्राथमिक परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1-तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील- इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता.

अर्ज फी

सर्वसाधारण/ OBC/ EWS श्रेणीसाठी अर्जाची फी ₹750/- आहे. SC/ST/PwBD/ESM/DESM यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा