PCMC Recruitment 2023 |मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजेच पीसीएमसीमध्ये मोठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी 303 पदांसाठी जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी आता ही भरती चालू आहे. आता ही भरती नक्की काय असणार आहे? यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते? कोणती पदे असणार आहेत? यासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण 303 अप्रेंटिस या पदाची भरती होणार आहेत. यामध्ये कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, एसी मेकॅनिक, प्लंबर, डेस्कटॉप ऑपरेटिंग, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, अरेखक स्थापत्य, भूमापक, मेकॅनिक मोटर वेहिकल या पदांसाठी एकूण 303 जागा भरण्यात येणार आहे.
हेही वाचा – WRD Maharashtra Recruitment 2023 | जलसंपदा विभागात 4497 पदांची नवीन भरती, पाहा नोकरीचे स्थळ आणि पगार
महत्वाची माहिती | PCMC Recruitment 2023
- शैक्षणिक पात्रता- संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे
- नोकरीचे ठिकाण -पिंपरी-चिंचवड
- Fee: फी नाही.
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
- भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर
- अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका