Maharashtra Metro Rail Bharti 2023 | महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये १३४ पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि इतर तपशील

Maharashtra Metro Rail Bharti 2023 | मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. आणि त्याबद्दलची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये (Maharashtra Metro Rail Bharti 2023) तब्बल 134 शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. या पदासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही लवकरात लवकर करा. कारण या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 ही आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र उमेदवार असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज केला तर तुमची निवड ही तुमची गुणवत्ता आणि कागदपत्रे या सगळ्याची चौकशी झाल्यानंतरच केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे. पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता त्याच बरोबर या पदासाठी तुम्हाला किती पगार मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

अर्ज शुल्क | Maharashtra Metro Rail Bharti 2023

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून महा मेट्रो रेल अर्ज भरू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवारांनी पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्जासाठी 100 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; पहा काय आहे पात्रता?

वय श्रेणी

उमेदवारांचे वय 17 ते 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – MPSC Recruitment 2023 : MPSC अंतर्गत मोठी भरती!! जाणून घ्या पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

वेतन

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु 8050/- वेतन दिले जाईल.