Bank of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Bank of Maharashtra Recruitment 2023 | मित्रांनो बँकेत नोकरी करावी असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु त्यांना ती संधी मिळत नाही तुम्हाला देखील बँकेत नोकरी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्केल 2 आणि स्केल 3 या पदांसाठी क्रेडिट ऑफिसरसाठी जागा सुटलेल्या आहेत. आणि यासाठी अधिकृत वेबसाईटकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तुम्हाला जर यामध्ये नोकरी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि ही नोकरी मिळू शकता. बँक ऑफ महाराष्ट्रकडून (Bank of Maharashtra Recruitment 2023) या क्रेडिट ऑफिसर्स पदासाठी 100 जागा भरण्यात येणार आहे. स्केल 2 साठी 50 पदे आणि स्केल 3 साठी 50 पदे अशी एकूण 100 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आज आपण या पदासाठी काय पात्रता लागते, त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया कशी असणार आहे. आणि तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा –IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; पहा काय आहे पात्रता?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्केल पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेली आहे. तर 6 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून ही नोकरी मिळवण्याची तुमच्यासाठी एक अतिशय चांगली संधी आहे.

पात्रता-

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त सर्व वर्षांमध्ये/ सेमिस्टरमध्ये किमान 60% गुणांसह विद्यापीठ/संस्थेमधून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. पदांसाठीची वयोमर्यादा उमेदवारांद्वारे तपासता येईल

निवड प्रक्रिया – Bank of Maharashtra Recruitment 2023

उमेदवारांना रिक्रूटमेंट एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेला बसावे लागेल. यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1:4 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निवडीसाठी किमान कट ऑफ गुण अनुक्रमे UR/EWS साठी 50% आणि SC/ST/OBC/PwBD साठी 45% असतील.

हेही वाचा – Air India Recruitment : 10 वी पास उमेदवारांना Air India मध्ये नोकरीची संधी; इथे करा अर्ज

अर्ज फी –

  • UR/EWS/OBC श्रेणीसाठी 1000 रुपये
  • SC/ST/PwBD श्रेणीसाठी 100 रुपये

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा